A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Gudi-Padwa Status Updates


उभारा गुढी सुखसमृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करूया नवआशेची.....

माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व त्यांच्या परिवाराला
गुडी पाडव्याच्या आणि
मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा. . . .


दिवस उगवतात दिवस मावळतात वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .


गुढी उभारली असेल आज तुझ्याही दारी,
चैतन्य असेल तेथे...आनंदात असतील सारी,
मनी मात्र माझ्या तुझ्या आठवणींची सभा आहे,
एकटीच गुढी अन् मी हि एकटाच उभा आहे...

पुढची गुढी मात्र तू नि मी सोबतच असू,
गोड जेवाया आपुल्या घरी दोघे एकत्र बसू,
गळी मंगळसूत्र,नाकी नथ तुझ्या ती शोभूनी दिसेल,
माळलेला गजरा तुझा....आपुल्या घरचं लावण्य असेल...

पावलांसोबत तुझ्या...घरा सुखसमृद्धी येईल,
हास्य तुझ्या माझ्या ओठी दुख सारे दूर नेईल,
तुला हि सखे देतो मी आजच्या शुभेच्छा....
पुऱ्या होवोत तुझ्या मनी सर्व इच्छा......


नवे वर्ष नवा हर्ष....नवा जोश नवा उत्कर्ष.....
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.....
नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों, हीच सदिच्छा...!!!


Sonapivaly Kiranani aale Navin Varsh,
Manomani date Nav Varshacha Harsh.

Hindu Nav Varhsachya Hardik Shubhechchaa !

Prev  12Next
Marathi Status