वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती ....!!
शब्दांचा आधार घेऊन जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी " अश्रूंची " गरज भासलीच नसती...!!
आणि........
सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किँमत कधी उरलीच नसती....
डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाही ....
याचा अर्थ असा नाही
की तु गेल्याचे दुःख मला होत नाही ...
जुने सारे पुरायाला वेळ नाही आता..
नवे काही स्फुरायाला वेळ नाही आता..
जाता येता पुन्हा अशी खडा नको मारू..
तुझ्यासाठी झुरायाला वेळ नाही आता..!
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं, हवा तो आकार देणं..
किती कठीण असतं.....?
हवं तिथं पोहोचणं, उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..
... किती कठीण असतं.....?
आपली वाट निवडणं, कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..
किती कठीण असतं.....?
नको त्या माणसांत मिसळणं, आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं..
किती कठीण असतं.....?
तुझ्या साठी बघ मी,
किती मोठ्ठं मन केलं.!!
तुला आवडतं खेळायला
म्हणून..
हृदयाचं खेळणं केलं..