A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Latest Status Updates


तीने ठेवलेल्या
नावाचे मी दहन केले ..
आणि तिझे पण नाव
लिहायचे बंद मी केले ..
आता नवीन काही तरी
करायचे ठरवले ..
दुसर्‍या साठी नाही आता
आपल्यासाठी जगायचे ठरवले ..
आणि आपल्यावर जे
प्रेम करतील त्यांच्यावर प्रेम
करायचे ठरवले .


एका बड्या नेत्याची गाडी सिग्नल वर थांबली
झेंडा विकणारा एक लहान मुलगा गाडीजवळ आला
साहेबांनी झेंडा तर नाही घेतला

पण त्या पोराला विचारलं

काय रे पोरा
कधी झेंडा
कधी पेपर
कधी रुमाल

सगळं तर विकतोस

काय नाही विकत ते सांग

पोरानं उत्तर दिलं

देश


तुला वाटेल
मी विसरुन गेलो
तुझ्या सारखा नाही मी
हेच सिद्ध करायला
पुन्हा फेसबुकवर आलो


प्रेमात नाही कुणाच्या तरी
आता प्रेमाच्या कवीता करतो

विरहात पण प्रेम थोड़े शिल्लक
असते हेच आता लिहतो

मला पून्हा प्रेम झाले
तिला जेव्हा विरहात आठवले
प्रेम प्रेम असते
नाही भेटले म्हणुन काय झाले


कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.
... बोलणे तुझे ते मधाळ
मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.
सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.
नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
स्वप्नांत मला हे असले भास...!!!!

Prev  1234Next
Marathi Status