A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Ganeshchaturthi-Sms Status Updates


सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची |
कंठी शोभे माळ मुक्ताफलांची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूरति दर्शानामाथ्रे मन:कामना पुरती || धु||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटि कुमकुम केशरा |
हीरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुन्ज्हुन्ति नूपुरे चरनी घागरिया ||२ ||
जय देव जय देव ||
लंबोदर पीताम्बर फनिवरबंधना |
सरल सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सादना |
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे , सुखरवंदना || ३ ||
जय देव जय देव ||


माझे गणराज ...........
.
येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती


तुमच्या मनातील सर्व
मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख,
समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आ रोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. " दे
आमची सेवा स्विकारुन घे महाराजा
सर्व मित्र-मैत्रिनीं ना हार्दीक शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया ॥


कडकडाट ढोल ताशांचा गर्जला त्रिभुवनी,
आनंद शेंदूरगुलालाचा पसरला दिशांतुनी,
स्वच्छ निर्मळ दूर्वा नी लखलखती आरास,
दरवळत्या सुवासाचे मोदक झकास.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीनिधीत्व करणार्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.


सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. " गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

Prev  12Next
Marathi Status