A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Broken-Heart Status Updates


मित्र बोलतात मला,
आठऊ नकोस रे तिला,
तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर...
ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी,
हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर...
ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,....
उठ आता,
अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर...
सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला,
ती गेली हे मानून,
आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर...
रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता,
उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा ,
ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता,
आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर...
आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर


खुप काही सांगायच होत तुलापण शब्दांनी साथ सोडून दिली,
.
.
कधी वेळेच कारण पुढे आलतर कधी तुझ्या अबोल्याने वेळ मारून नेली.......!!


मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची
होत आहे का . . . ?
तर ती हसून बोलली
मी पहिले होतेच
केव्हा तुझी .


कधीतरी माझ प्रेमही
समजून घे एकेदिवशी
मी तुलाच काय . .
सगळ जगच
सोडून जाणार आहे . .


आज तुला मी नको आहे, हे मला ही
कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासने ने मन जळतय.... ...
एक दिवस असा होता,
जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचास
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारकी
जपायचास,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास
वाट बघायचास,
डोळ्यात डोळे घालुन माझ्या
स्वतःला त्यात शोधायचास.....
पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
माझं असं काय चुकलं की,
तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय.....?
मला जे समजायच ते मी समजले आहे,
आज तुला मी नको आहे,
हे तुझ्या वागण्यावरुन जाणवलं आहे....
तरी त्यात तुझं सुख असेल
तर माझी काही हरकत नाही,
तु सुखी होणार असशील तर,
मरणाही माझा नकार नाही.....
पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
तुला कधीतरी माझी आठवण नक्की
येईल,
मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर
होईल
पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला
दिसणार नाही,
कारण तुझ्यापासुन दुर राहुन,
मी जास्त दिवस जगणार नाही.

Marathi Status