A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Wise Status Updates


गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!

काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!

गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गी य माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!

शब्दाने शब्द वाढला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते…


लोकं ही कधी कधी
फुग्या प्रमाणे वागतात
थोडी फुंकर काय मारली
लगेचं फूगून जातात
थोड्याश्या हवेनेचं
खुप फुलून वर येतात
स्वतःला मोठे इतरांना
तुच्छ समजतात
उडता काय यायला लागते
जमीनीला विसरुन जातात
स्वतःच्या मर्यादा न जाणता
बेलगाम भरकटतात..
वास्तवतेच्या सुईला भिडताचं
भ्रमाचे फुगे फुटतात
सारी हवा निघून जाते
पुन्हा जमीनीवरचं येतात.....


आयुष्यात वाईट तेव्हा वाटते ...
जेव्हा आपण काही चुका करतो...

पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो..


काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात....


गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे:

1. एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.
२. झोप चांगली लागते.
३. मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही.

४.आपण कसे दिसतोय, यावर फालतू वेळ खर्च होत नाही.
५. मध्यरात्री,उत्त र-मध्यरात्री, भल्या पहाटेवगैरे भलत्याच वेळांना एसेमेसवाजत
नाहीत आणित्यांना तात्काळ उत्तर देण्याचं बंधन तर मुळीच नसतं.

६.महिन्यातून 100 दा मोबाइल रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.
७.मुलगा कितीही मुलींशी आणि मुलगी कितीही मुलांशी बोलू शकते.
८.कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं......!

Marathi Status