A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Wise Status Updates


तुमच्या जोडीदारा "बद्दल" जाणून घेण्य पेक्षा...जोडीदाराला जाणून घ्या..
कारण त्याच्या इतिहास तुम्हाला काहीही देणार नाही ..अन तो बदलता हि येणार नाही..
पण त्या व्यक्तीचे संस्कार,विचार, गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन, आणि इतर काही गोष्टी..ज्या गोष्टीचा तुमच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडणार आहे..त्यांचा विचार करावा !


संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त तसं पाहायला हवं,
प्रत्येक नात जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं,
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त ते समजायला हवं,
प्रतेकान्कडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो, फक्त निस्वार्थी असायला हवं.


माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण,
माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही,

म्हणून आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.


"आयुष्यात प्रत्तेक चुकीला माफी मिळेलच असे नाही.....!!

काय लागतं नक्की कुणीतरी आपल्या मनाच्या जवळ यायला....????

तसं समोरची व्यक्ती दिसायला सुंदर असलं कि....,
लक्ष पटकन जाते आणि आवडायची क्रिया पण पटकन सुरु होते हे मान्य आहे.....
पण कधी कधी समोरची व्यक्तीला न पाहता पण ती व्यक्ती तुमच्या मनात घर करून जाते.....

मनात घर करायला फक्त तश्या प्रसंगाची गरज असते....,
समोरची व्यक्ती कधी कधी आपण ज्या मनस्थितीतून जात आहोत... त्या परिस्थितीत आपल्याशी कशी वागतेय ह्यातून आपल्या पासूनचे अंतर कमी जास्त करते.....

कधीतरी स्वतःच्याच माणसांकडून दुखावलेलं " एकटं मन " तुम्हाला कुठे भरकट घेऊन जाईल काही सांगता येत नाही..... याच काळात स्वतःला सावरले तर ठीक नाही तर आयुष्याच्या बऱ्याच चुका ह्या एकटेपणात होतात.....

ठराविक वेळेत मिळालेले " जिव्हाळ्याचे दोन शब्द " पण एखाद्या व्यक्तीला तुमच्या जवळ आणू शकतात.... ते " जिव्हाळ्याचे दोन शब्द " आपल्यालाआपलं माणूस विसरायला लावून नवीन अनोळख्या व्यक्तीकडे ओढत नेतं.....

" परिस्थिती आपली मनस्थिती ठरवते आणि आपली मनस्थिती आपली कृती ठरवते......"

म्हणून एकटेपणात स्वतःला जरा सावरायचं....,
मनाला जरा थोडंसं आवरायचं....,
शांत करायचं थोडं मन...,
अन मग काय ते ठरवायचं...

कारण

" आयुष्यात प्रत्तेक चुकीला माफी मिळेलच असे नाही....!!"


किती सहजा सहजी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला परकी करून टाकतो..त्यांच्या कडून घडलेली एखादी चुकीची गोष्ट आपल्याला त्यांचा तिरस्कार करायला लावते...सोबत घालवलेले सोनेरी क्षण..प्रेमळ संवाद..हे सगळे एका क्षणात विसरले जातात! आणि त्या प्रिय व्यक्तीशी आपण बोलणे बंद करतो..!


कडवे सत्य
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
आणि
सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे
.............................. ......"विश्वास" ..............................

Marathi Status