A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Poem Status Updates


आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं.

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला
आपणच आवरायचं असतं .

खरं प्रेम एकदाच होतं
ते कधीही विसरता येत नाही
शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ
अनेकांवर पसरता येत नाही....!!!!!!


नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला
नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला
जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला
लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला
मलाच आहेर द्यावा लागेल
तुझ्या लग्नाला!!!!!!!! !!!
नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला
कदाचित लागेल तुला उष्टं खायला
कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला
मलाच यावं लागेल तुझ्या लग्नाला!!!!!!!
नाही जमणार तुला माझं मन सांभाळणे
नाही सहन होणार तुला माझं रागावणं
नाही आवडणार कदाचित माझं विचित्र वागणं
बेधुंद बेदरकार बेफिकीर असणारं माझं
जगणं!!!!!!!


कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी....,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...???
लाख झाला असेल मनाचा दगड....,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??
जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...??
या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य..
पण..... तरीही जीव जडतातच ना .....??


जे तुला हि न कळले,
जे मला हि न कळले,
ते आपल्या नयनांना कळले...
अबोल प्रेम हे आपले,
आज सार्या जगाला कळले....
फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले...
अन कळत नकळतच,
आपल्या या मैत्रीच्या नात्याला,
प्रेमाचे नाव जुळले...
प्रेमाचे नाव जुळले...


तुझी नी माझी भेट ती
क्षणो क्षणी का आठवे
आधी कधी ना वाटले
काही तरी होते नवे
सांगू कश्या मी तुला सख्या रे
माझ्या या भावना माझिया प्रियाला प्रीत कळेना …..!

जागुन तारे मोजतो आहे
तुझ्यात मी ही रुजतो आहे
कधी तुला गं कळेल सारे
खेळ आहे जुना
माझिया प्रियाला प्रीत कळेना …..!

Marathi Status