आधुनिक युगातल्या म्हणी...
1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर
2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये
3) वंशाला हवा दिवा, ह म्हणते ईश्श तिकडे जावा
4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन
5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क
6) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत
7) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये
8) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार
9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार
10) मनोरंजन नको रिंगटोन आवर
11) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा
12) जागा लहान फ़र्निचर महान
13) उचलला मोबाईल लावला कानाला
14) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार
15) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं!!