A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Miss-You Status Updates


तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??????
अश्रु ही कसे झर झर झरतात...
तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात...

तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
स्पंदनंचा ताल ताल हरवतो
प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो

तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
माझे शब्द नी शब्द विखुरतात
माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात


अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी


तुझी आठवण....
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.. .
डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू,
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.
खरच.. ... . .
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही


तुझ्याशी न बोलायचा प्रयत्न तर मी खूप करते...
पण तुझी काळजी केल्याशिवाय माझ मन च लागत नाही...

तुझ्यापासून खूप दूर जायचं प्रयत्न तर मी रोज करते...
पण तुझी आठवण आल्याशिवाय श्वास घेत नाही...

काय करू ह्या अशा वागण्याला मला माझच समजत नाही...
करतेय स्वताला तुझ्या पासून दूर पण...

का मी तुझ्या आठवणीतून बाहेरच येवू शकत नाही..


मन अबोल शांत असताना मीच उगा छेडते
तुझी ओढ ती किती जी अलगद मला खेचते
प्रत्येक आठवणीत तुझ्या आठवांचे मोती वेचते
हरवून बघ माझ्यात तुही तुला शोधण्यासाठी खरच
माझ सारकाही सख्या फक्त तुझ्यासाठीच.....!!!

Marathi Status