A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


स्वप्न परी तू भासतेस जणू
दिसतेस अती गोड
पुन्हा पुन्हा निरखून पाहावे तुला
सारखी सारखी मला लागते ओढ

वाटते मनाला पडावे तुझ्या प्रेमात
हृदय स्पन्दनेही तुझच नाव घेतात
प्रथम दर्शनीच तुला बघता
वेड मला लागले तुझे

नको वाटते आता
तुझ्या पासून लाबं राहणे
सारखे वाटते जवळ येउनी
तुझ्या मिठीत राहणे

सखे साथ दे मजला
राहीन तुझा दास बनुनी
तुझ्या प्रेमाच्या सागरात डूबुनी
पूर्ण जिवन देईन वाहुनी ...


मला नाही माहीत
मी तुझ्या जिवनातील
पहीली व्यक्ती आहे की नाही....
आणी
मला माहीत करून घ्यायचेही नाहीये....
पण जोपर्यंत मी जीवंत आहे
तो पर्यंत मी तुझ्यावर येवढं प्रेम करेन की...
विश्वासाने उभ्या जगाला सांगु शकेन...
तुझ्या जिवनातील कदाचित पहीली नाही पण शेवटची व्यक्ती फक्त मीच असेल....


सगळ्यांच्या आयुष्यात एक वळण अस येतं ......
अन् सगळं काही बदलतं .....
अन् हे घडतं तेव्हा आपण आपले राहतचं नसतो ......

आपल्या आयुष्यात चोरपावलांनी ....
कुठून येते ती व्यक्ती अचानक .....

कशी ? .....
व का भेटते ? ती व्यक्ती आपल्याला ? ....

एक अनोळखी वळण ......

जिथे आपल्या पावलांना मिळते ....

दुसऱ्या दोन पावलांची साथ ....

अन् सुरु होतो एक मर्यादित प्रवास ....

येथुन जगणं नव्याने सुरु होतं ....

त्या व्यक्तीशिवाय आयुष्य जगणं ....

ही कल्पना देखील नकोशी वाटते ....

येथुनच प्रत्येक भावनेला अर्थ ....

प्रत्येक हाकेला साद ....

दुःखाला सांत्वन मिळत ....

काट्यांवरुन चालतांना देखील ....

फुलांच्या संवेदना जाणवतात ....

त्या व्यक्तीच्या केवळ स्मरणाने ....

हृदयाची स्पंदनं वाढतात ....

त्या व्यक्तीचा स्पर्श देखील ....

पहाटेच्या गारव्या इतका धुंद वाटतो ....

एक अनोळखी ओळख असते ही ....

कितीही नाही म्हटलं ....

तरीही हवी - हवीशी वाटणारी ...... !

अन् अनोळखी ओळख म्हणजेच " प्रेम " ... !!!


Online ती ही असते,
Online मी ही असतो..
बोलावस तिलाही वाटतं..
बोलावस मलाही वाटतं..
परंतु बोलत ती ही नाही..
बोलत मी ही नाही..
Last seen माझ तीही सतत पाहत असतें..
Last seen तीच मी ही सतत पाहत असतो..
मेसेज पाठवावा मलाही वाटत
मेसेज पाठवावा तीलाही वाटत
परंतु पाठवत तीही नाही..
पाठवत मी ही नाही..
प्रत्येक स्टेटस अपडेट माझे तीच्यासाठीच असते..
प्रत्येक स्टेटस अपडेट तीचे माझ्यासाठीच असते..
वाचत ती ही असते..
वाचत मी ही असतो..
स्टेटस वाचुन वाटत बोलाव भरभरुन एकमेकांशी..
परंतु ती ही बोलत नसते..
मी ही बोलत नसतो.


मन वेडं,
प्रत्येकाच असतं कुणाच कमी,
कुणाच जास्त असत..
मन वेडं...
कधी ना कधी नक्की फ़सतं
कुणाच रडत बसतं
कुणाच उगाचच् हसतं मन वेडं...
हे खुप नशीबवान असतं
आपल्याच नकळत हे
तिच्यासोबत असतं मन वेडं...
हे पाखरां सारख असतं
ते पंखाने उडत असतात हे मात्र
पंखाविना उडत असतं
मन वेडं...
हे कधीच आपलं नसत ते फ़क्त तिचच असत
कधी हरवल तर्
तिच्या सावली मागे सापडतं....
मन् वेडं प्रत्येकाच असतं कुणाच कमी
कुणाच जास्त असत.. ..

Marathi Status