A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Sad Status Updates


कधी कधी काही पाऊले अशी पडतात..
की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात..

काही गैरसमज इतके मनाला बोचतात..
की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..


एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे
असतो ,,
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर
सर्वजणं असतात ,,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .....


छापा असो वा काटा असो.......
नाणे खरे असावे लागते.......

प्रेम असो वा नसो.....
भावना शुद्ध असाव्या लागतात...

तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी.....
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात....

पण...,

मने मात्र कायमची तुटतात....


केव्हातरी सांगेन मी
असती मलाही भावना
तोडून म्हणता वेचली
वाहून करता प्रार्थना

केव्हातरी सांगेन मी
की श्वास गुदमरतो कसा
शेंदूर हाराभिषेकही
ओझे मला ठरतो कसा

केव्हातरी सांगेन मी
असती कश्या या वेदना
तोडा जपुन सध्या तुम्ही
वर्षा रूतू हरवेल ना!


आजही मला,
एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत...

माझ्या काही शब्दांन मोळे, हरवल मी तुला,
आज त्या शब्दांना आठवून,
स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत...
अन तू नसतानाही,
ह्या आठवणींच्या विश्वात,
फक्त तुलाच पाहायला आवडत...
फक्त तुलाच पाहायला आवडत...

Marathi Status