प्रिये तुझ्या आठवनित काल चालत होतो..
तेव्हा एका Bike ने मला ठोकले ..
हाताला जखम झाली आणि भरपूर रक्त वाहूलागले ..
... रक्त वाया जाऊ नए म्हणून,
मी त्यानेच Love letter खरडले ..
या सगळ्या लफड्या नंतर..
मी डॉक्टर कड़े गेलो ..
त्याने पाच टाके लावले आणि,
बिलाचे पाचशे रूपये घेतले ..
प्रिये तू माझ्यात interested आहेस या नादात ..
मी नेहमीच तुला call करत राहिलो..
तुझा Reply नाही आला ..
तरीही मी SMS करत आहिलो ..
महिन्याभाराचा balance माझा,
आठवडयातच संपायला लागला ..
प्रिये तुझ्या साठी..
मी गुलाबाचं झाड लावणार आहे,
तुझा मला होकार असेल तर ..
तुझ्या केसांत गुलाब लावणार ..
नाहीतर फूलवाला बनून ..
माझे balance चे पैसे वसूल करणार आहे..
प्रिये तुला भेटायला मी तुझ्या घरी येणार आहे ..
तुझ्या घरातल्यांना मी आवडलो तर ..
तुला मी perfume gift देणार ..
आणि नाही आवडलो तर salesman बनून ..
फेनोइल आणि Detergent विकून माझे..
Perfume चे पैसे वसूल करणार आहे ..
प्रिये तुझ्या आठवनित मी ..
एक chicken shop उघडणार आहे ..
तुझ्यावरचा राग ..
मी तिथल्या कोम्बड्यां वर काढणार आहे..
पण तिथल्या अंड्यांना मी ..
माझ्या मनातल्या प्रेमासारखी जपनार आहे ..
बघ तुला आठवतात काय ते Pizza Hut's चे pizzas ..
आणि CCD's च्या coffees ...
Natural's च्या त्या ice -creams ..
आणि मी तुला सांगितलेल्या त्या माझ्या Day dreams ..
प्रिये आपली झालेली प्रत्येक भेट ..
मला सुखद आठवण देऊन गेली ..
पण प्रत्येक वेळी माझ्या पाकिटातली..
at least १०० रुपयांची नोट घेउन गेली..
निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी
मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझा आवडता पक्षी आहे.
...कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला ते बनवता येत नाहीत पण खाता येतात.
कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.
कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.
कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते.
पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना कोंबडीचोर म्हनत. चोरी करणे चूक आहे. चोरी केल्यावर आजकाल जेलमध्ये टाकतात. पुर्वी जेलमध्ये जाणे वाईट मानत व लोक त्यांचा तिरस्कार करत पण आज जेलमध्ये जाणार्याला लोक नेता म्हणुन निवडून देउन "लोकसभा" नावाच्या ठिकाणी पाठवतात. तिथे गेल्याने माणुस खुप श्रिमंत होतो असे माझे बाबा सांगतात.
कोंबदी अंडे देते. ते बहूपयोगी आहे. "आओ सिखाउ तुम्हे अण्डे का फण्डा" या गाण्यात त्याचे वर्णन आहे. त्या गण्यात मोनीका बेदी आहे. तिला जेलमध्ये अंडी देत होते.
अंडे संडे या मंडे खाल्ले पाहीजे. मंडेला काही लोकांचा उपास असतो. नेल्सन मंडेला यांचा उपास असतो का हे मला माहित नाही. असो....कोंबडीचा बळी देतात. बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. कोंबदीला पळत जाऊन पकडने माणसाला हुशार बनवते.
प्रश्न: बायको माहेरी गेल्यावर
नवऱ्याला रोज फोन का करते ?
?
?
?
?
?
ऊत्तर: कारण नवऱ्याला आठवन
राहीली पाहीजे
की धोका टळला नाही तो परत
येइल......!!!!
चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं-
"फोडण्याचा प्रयत्न करू नका फक्त बटण दाबा आपोआप
उघडेल"
ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो,
त्यानंतर लगेचच पोलिसत्याला पकडायला येतात.
तेव्हा चोर म्हणतो,
आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे.
माझी लाईफ स्टाईल
दोन प्रकरच्या पोरींच्या मागे तुम्ही नका धाऊ.
१) ज्यांच्या मागे मी आहे, कारण त्या तुम्हाला कधीच
नाही पटणार.
२) ज्यांच्या मागे मी नाही, कारण
ज्या मला नाही पटल्या, त्या तुम्हाला काय पटणार.
:p