A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Nice Status Updates


तुळशी" ची जागा आता "Money plant" ने घेतलीय...

"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...

वडील जिवंतपणिचं "डैड" झाले, अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??

भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"......

दिवसभर मुलगा CHATTING चं करत नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो....

दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy" झाली...

घरची भाकरं आता कशी आवडणार हो...

५ रु. ची Maggi आता किती "Yummy" झालीये......


विश्वास बनून माणसे जीवनात येतात ...,
स्वप्नं होऊन मनात घर करून जातात ...
सुरुवातीला विश्वास देतात कि ते आमचे आहेत ...,
मग का कोणास ठाऊक एकटे सोडून जातात...!!!


थंडी वाढत चालली होती...
बहिणीला स्वेटर घेण्याइतके पैसे भावाकडे
नव्हते..
घरात कापड हि नव्हती..
जी पांघरता आली असती...
मजुरीचे पैसे जेवण घेण्यात गेले होते...
घरी आल्यावर ती म्हणाली "दादा अरे आज थंडी पडलीये रे खूप..."
विनीत म्हणाला:आग हो तू एक काम कर...
मला गरम होतंय ग... तू माझा shirt घाल
आणि झोप...
रात्र वाढली थंडी वाढली...विनीत च्या दातांच्या कडकण्याच्या आवाजाने ती जागी झाली...
आणि तिला माहित होत दादा बोलणारच नाही ...
तिने एक स्वेटर विणल होत ते तिने हळूच
अंगावरघटल त्याच्या,....
आणि सकाळी उठण्या आधी स्वेटर काढलं
असं रोज चालायचं
एक दिवस विनीत ने सकाळी उठल्य्वर म्हटलं "अग तुला माहितीये मला जराहि थंडी वाजत नाही रात्रीची...." )
आणि ती मनातल्या मनात हसायची आणि म्हणायची"वेड्या ­ दादाची वेडी हि माया..."
आयुष्यत दुसर्यांना ममता द्या ती तुमच्या कडे तशीच येते कि नाही ते पहा.


Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना'virus'लागलाय
दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute

computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन'mother'नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook.......


अनोळखी जगासाठी जणू
एक एकाकी असे स्वप्न आहे
कधी प्रश्नांणी सुध्दा अवघडावे
एक अशक्य असे उत्तर जपण आहे
ज्याला कधीचं नाही समजू शकणार
त्याच्या साठी एक मोठे कोडेचं आहे
जो समजून घेईल त्याच्यासाठी मात्र
म्हणायला तसे तर फार थोडे आहे

Marathi Status