कोणी म्हणतं seven days and six
nights चं package म्हणजे प्रेम...???
मी म्हणतो चांदणी रात्र,
एक झोपाळा, आणि
हातात तिचा हात म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं पॅरीसच्या संध्याकाळची रोषणाई म्हणजे प्रेम....
मी म्हणतो तिला अचानक
भेट दिली की, तिच्या डोळ्यातली ती
चमक म्हणजे प्रेम!
कोणी म्हणतं काश्मीरच्या बागेत एकत्र फिरणं म्हणजे प्रेम....??
मी म्हणतो न सांगता एखादा गजरा तिच्या डोक्यात माळणं म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं फॅन्सी आणि स्टाईलिश
कपडे घालून नवऱ्याबरोबर फिरणं म्हणजे
प्रेम.... ?
मी म्हणतो सणाच्या दिवशी
नटलेल्या तिच्याकडे डोळे भरून पहाणं
म्हणजे प्रेम !
कोण म्हणतं तिला गुलाबाचा गुच्छ
देणं म्हणजे प्रेम.... ???
मी म्हणतो सगळ्यां देखत
एक क्षण चोरून तिला
"छान दिसतेस"
असं म्हणणं आणि
ते ऐकून तिचा चेहरा
गुलाबी होणं म्हणजे प्रेम !
कोण म्हणतं तिच्या सुंदरतेवर कविता
करणं म्हणजे प्रेम....???
मी म्हणतो ती माहेरी असताना
प्रत्येक कवितेत तिला पाहणं
म्हणजे प्रेम !
कोण म्हणतं लाजेचा पडदा काढून
एकामेकांना जाणून घेणं म्हणजे
प्रेम....???
मी म्हणतो लग्नाच्या १५ वर्षानंतर सुद्धा उखाणा घेताना लाजणं म्हणजे प्रेम !
कोण म्हणत लग्नानंतर १० दिवस असते ते प्रेम...???
मी म्हणतो मनात प्रेम जागं ठेवलं तर आयुष्यभर टिकते प्रेम....
का आहे आस कोणाची
मज हेच कळत नाही
प्रेमाचे धागे तुटता
का तुटत नाहीत
दूर गेला मज सोडून तो
हे माहित आहे मजला
तरी हि तो येईल पुन्हा
हा एकच ध्यास लागला
डोळे वाटेवर ठेउनी
मी वाट पाहे त्याची
तो येईल इतक्यात
भेट होईल का माझी
नाही आलास तरीही
मी इथेच आहे उभी
शेवट पर्यत मी आहे
फक्त आणि फक्त तुझी
प्रेमाचा अर्थ ...............
सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
मंदिरामध्ये दर्शन करताना जी जवळ
असल्याचा भास होतो ते प्रेम आहे
भांडून सुधा जिचा राग येत नाही ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा
थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन
मोकळे झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत
जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते ते प्रेम आहे जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर
एकांतात हसू येते ते प्रेम आहे
गाईचे वासरावरती असते ते प्रेम
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम
आईचे मुलांवर असते ते प्रेम
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर
खरे प्रेम असावे
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही
खरे प्रेम असावे
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही
खरे प्रेम असावे
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे
खरे प्रेम असावे
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे
कारण
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही !!!
भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...
प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते
विसरन्याची...
खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ
करताना...