मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच ...........
नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच ..........
आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत
वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत
रक्ताच्या नात्यात नसेल
एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशीही असली तरी शेवटी
मैत्री गोड असते...
मैत्री म्हणजे त्याग आहे
मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर
मैत्री खरा श्वास आहे
मैत्रीच्या या नात्या
बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी
त्यात खरा आनंद असतो...
आई"म्हणजे भेटीला
आलेला देव,
"पत्नी"म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि"मित्र"म्हणजे
देवाला ही न मिळणारी
भेट....
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित...
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि.....
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि....
काय असते हि मैञी?
ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत
नाहि....
मैत्री..............
नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी..
नको सूर्यासारखी ,सतत तापलेली...
नको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी....
नको सावली सारखी,कायम पाठलाग करणारी....
मैत्री.......
हवी अश्रुसारखी ,सुख दुखात समान साथ देणारी......