A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Me-Marathi Status Updates


असे कुनापुढे झुकनारी हि मान नाही..
मी राजा आहे रयतेचा शैतान नाही..
आभिमान आम्हाला आमच्या मातिचा..
माज आहेच मराठ्याच्या ज्यातिचा..
या छातित धमक आहे स्वराज्य उभे
करण्याची..
औरंग्या तुझी औकात
नाही मराठ्यांना पराभुत करण्याची..
तुला माज असेल रे या तख्ताचा..
तौबा करशील तु तडाखापाहुन
भगव्यारक्ताचा..
तु काय आम्हाला धाक दाखवीतो..
जो सर्वांचा काळ आहेतोच आम्हाला भितो..
राख होते शत्रुंची अशी डोळ्यात
आमच्याआग आहे..
लांडग्याची जात तुझी
मी सह्यांद्रिचा वाघ आहे...
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभुराजे॥


मराठयाची तरवार कधीच म्यान होत नाही
धर्मशत्रुच्या शिराची कधीच गय होत नाही. . . . . .
लाख देवू आहूती खातर धर्माभिमाना. . . .
अंगावर याल तर शिंगावर घेवू हाच आमचा बाणा. . . .
रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे...!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे...!
मनातला शिवाजी आजही जिवंत आहे.....!!
जय जिजाऊ..
जय शिवराय..


''भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण
देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे
तख्त...!!!
''सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त,
आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त...!!!


लावुन जिवाला घोर..मनगटी जोर.. मराठी पोर.. लढाया पुढती..

ह्रुदयात क्रांतीची माळ.. असत्या जाळ.. नमवीला काळ.. पाऊले अडती..

हा असा मराठी वीर.. लधरला धीर.. घेऊनी तीर.. स्व:ता हातात..

फ़ोडुन जुलुमाचा तिढा..तख्ताला तडा..घेऊनी धडा..शिवबाचा लढा डोळ्यात


इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...

माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...

मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी... :) :) :)

Marathi Status