मैत्री असते एक नात माणसा-माणसाला जोडणार;
भावनांच्या
आधारावर विचारांच्या सहाय्याने विश्वास पेलणार......
मैत्रीत तुझ माझ
काहीच नसत;
जे काही असत ते आपलच असत...
कधी मस्ती कधी गंभीर ;
निराशेच्या
अंधारात आशेचा कंदिल....
मैत्री नसावी चंद्रासारखी कलाकलांनी बदलणारी;
ती असावी सुर्यासारखी जिवन सुतेज करणारी....
मैत्री नसावी एकाबाजूला
कललेली ;
ती असावी एकमेकांना समजून घेणारी....
मैत्री असावी
आयुष्यभर टिकणारी;
आयुष्य संपल तरी मित्राच्या आठवणी जपणारी.
जिथे बोलण्यासाठी " शब्दान्ची " गरज नसते....,
आनन्द दाखवायला " हास्यची " गरज नसते...,
दुःख दाखवायला " आसवान्ची " गरज नसते...,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते....
ति म्हणजे " मैत्री "....!!!
नको करूस प्रेम... मैत्री तरी करशील ना...?मैत्री नुसती करू
नकोस... शेवट पर्यंत निभावशील ...ना...?मैत्री कधी तोडू नकोस..
ह्या वेड्याचा जीव जाईल ना...!!
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,चुकलं तर ओरडणं,कौतुकाची थाप देणं,एकमेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.
"मैत्री"म्हणजे
'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो.
'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो.
"मैत्री" असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक 'बाद' झाला तरी
दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...