दिव्याने दिवा लावत गेलं
की दिव्यांची एक दिपमाळ तयार होते,
फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलहार
तयार होतो,
आणि माणसाला माणूस जोडत गेलं
की'माणूसकीचं'एक सुंदर नातं तयारहोतं."
जेव्हा कुणी तुमचे हृदय तोडते,
जास्त दुःखी व्हायचे नाही..
कारण..?????
निसर्गाचा नियम आहे की,
गोड फळे देणाऱ्या झाडाला..
खूप साऱ्या दगडांचा मार,
सहन करावाचं लागतो......!!!!
तुमच्या दुखाःमुळे कुणाला आनंद मिळाला तर मिळू द्या
पण आनंद मिळवण्यासाठी कुणाला दुखः देवू नका....
देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होत ...
"तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा ,
तुमच्यासाठी
... तुम्हाला काही मागण्याची गरजच
... भासणार नाही...
"जर आपल्या जीवनात असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे
आपल्या जीवनातील महत्व ,आपल्यासाठी त्या व्यक्तीची किंमत..
आपल्या जीवनातील त्या व्यक्तीचे स्थान....
खरोखर हे जाणूनचं घ्यायचे असेल .........
तर त्या व्यक्ती पासून काही काळ दूर जा आणि
त्या व्यक्तीला विसरायचा प्रयत्न करुन पहा .....