उगवला नभी सुर्य
अजून एका प्रसन्न सकाळी
चराचरात चैतन्य आले
अंधारी रात्र कुठे गडप झाली
मंद मंद वारा डोलणारे फुल
उमललेली हर एक कळी
सोनी पिवळी कोवळी किरणे
धरेवर अथांग चहुकडे पसरली
खिडकीतून डोकावून आत आली
हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली
उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली
दुःखाला सांगा ' खल्लास'
प्रत्येक दिवस असतो ' झक्कास '
नका होवू कधी ' उदास '
तुम्ही आहात एकदम ' खास '
आनंदी रहा प्रत्येक ' क्षणास '
प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी ' ध्यास '
असूद्या स्वतःवर नेहमी ' विश्वास '