आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे Attachment (गुंतलेले मन) .......
खूप दुख होते जेव्हा आपण ती घालवून बसतो..., आपण एकटे पडतो ....
पण आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकांतपणा .....
कारण एकांतपणा आपल्याला खुपकाही शिकवतो आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपण सर्व काही मिळवतो .
बघ वळून कधी मागे आठवण माझी झाल्यावर..
तुझ्याच मागे सावली उभी असेल माझी उन ही गेल्यावर..
बघ हसून कधी आठवण माझी झाल्यावर..
खळाळणारे हसू माझेच असेल तुझ्या ओठांवर..
बघ चालून दोन पावले माझ्या दिशेने कधी आठवण माझी झाल्यावर..
हात माझे उधळीत असेल फुले तुझ्या प्रत्येक पावलांवर ..
मी पाहतो नेहमी
एक स्वप्नं जागेपणी
तीच तू , तोच मी ,
डोळ्यातून बोलणारी ,
स्पर्शातून फुलणारी ,
ती प्रीतही तशीच आहे.
पण आज आहेत आपल्याभोवती,
सुखदु:खाच्या चार भिंती,
आपल्या छोट्याशा विश्वाची,
आपल्यापुरती समाप्ती.
या वात्सल्य विश्वात ,
रांगतंय भविष्य आपलं
एक सुंदर गोड स्वप्नं ,
आपल्या प्रीतीला पडलेलं !
माझं एव्हढ स्वप्नं,
जरा पहाटेला कळू दे.
तुझ्या कुशीत माझ्या,
प्रेमाचा अंकुर फुलू दे.
प्रेयसी :- प्रेमाचे चिन्ह जे बदाम त्यातून नेहमी आरपार गेलेला बाण का दाखवितात ?
प्रियकर :- जसे रस्त्यावरील रहदारीचे चिन्ह गाडी चालविण्याराला सावधानतेचा इशारा देते, तसेच प्रेमात पडू पाहणार्या मित्र-मैत्रिणी साठी हा सावधानतेचा इशारा आहे, " कि बाबांनो प्रेमात पडत आहात, पण जरा जपून, हा बाण टोचतो आणि हृदय दुखवले जाते !!!!
मिठीत तुझ्या अलगद लपवून घे मला...
कारण तुझ्या मिठीत मला पांघुरणात आल्यासारख वाटत...
तुझ्या मिठीत जगाचं अस्तित्व हरवल्यासारख वाटत...
कोणताच आवाज नाही....
कोणतीच चाहूल नाही...
फक्त तुझ्या माझ्या हृदयाची स्पंदनेच एकू वाटत..
मिठीत तुझ्या आज मला हरवावस वाटत ...
आणि हा क्षण इथेच थांबवावा बस इतकच वाटत.