प्रेम इतकं अवघड का असतं
समजायला, उमजायला, व्यक्त करायला
असं नक्की काय असतं त्यात
की लागते ती इतकी आवडायला
चार-दोन मोकळ्या गप्पा, जूळते सूर
पूढची भेट कधी वाटणारी हूरहूर
नंतर मग नुसतं डोळ्यांनी बोलणं
या मनीचं त्या मनी, कोण्या जन्मीचं देणं
काही न घेता तिला देण्याची आस
बाकी काही नको, फ़क्त तू अशीच हास
निस्वार्थी, निरागस, निर्मळ असं प्रेम हवं
प्रेमात पडावं अणि फ़क्त ते अनुभवावं!
काही काही माणसे किती खोट बोलतात त्यांचा बोलण्यातून वाटते यांनी खोट बोलण्याचा डिप्लोमा केला आहे.
समोरचा माणसावर आपण खूप विश्वास ठेवतो आणि अचानक एक दिवशी कळते कि ती वक्ती त्या विश्वासाला लायक नव्ह्तीच
त्या वेळी खूप वाईट वाटते.
जर एखाद्याला तुमचाशी मैत्री करायची असेल किंव्हा त्या वाक्तीचे तुम्चावर मनापासून प्रेम असेल ,
तर तो/ ती तुमचा स्वीकार तुम्ही जसे आहात तशा परीस्थीतीत करेल..
थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम कराव
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं..
मग आपणच जाऊन Sorry म्हणावं, असं प्रेम कराव
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं, असं प्रेम कराव
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं,
पुन्हा त्या बरोबर येणार्या वेदनांना ही सामोरं जावं..
असं प्रेम करावं..
तुला माहिती आहे देवाने असे का केले की आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे दिले पणहृदय मात्र एकच दिले??
.
.
.
.
कारण
.
.
.
.
ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे दुसरे हृदय शोधावे म्हणून.
नाती जपली कि सगळ जमत.
हळू हळू का होईना कोणी आपलस बनत,
ओळख नसली तरी साथ देऊन जात,
आणि
आठवणींच गाठोड आपलस करून जात.