गावातल्या आडावर ४ बायका पाणी भरत होत्या.
त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता,
तर त्याला पाहुन ती म्हणाली,
तो बघा माझा मुलगा इंग्लिश मेडियामला आहे.
पुन्हा दुसरीचा मुलगा तिथुन निघाला तर
त्याला पाहुन ती पण
म्हणाली तो बघा माझा मुलगा खाजगी शाळेत आहे.
त्यानंतर तिसरीचा मुलगा तिथुन निघाला होता तर त्याला पाहुन
त्याची आई म्हणाली तो बघा माझा मुलगा सीबीएसई ला आहे.
तेवढ्यात चौथीचा मुलगा तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला, पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला आई चल घरी.
त्याची आई म्हणाली जि प च्या शाळेत शिकत आहे . आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी तिघिंच्या नजरा खाली गेल्या.
सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून देखील 'संस्कार' विकत घेता येत नाही..!
देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होत ...
"तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा ,
तुमच्यासाठी
... तुम्हाला काही मागण्याची गरजच
... भासणार नाही...
कुणाच्या ही भावनांशी खेळू नका ......
कारण त्या खेळात तुम्ही जरी जिंकले
तरी त्या व्यक्तीला कायमसाठी हरवून बसाल....
हसतमुख चेहरा म्हणजे ...
कसलेचं दुखः नाही असे नाही ...
पण दुखःशी दोन हात करणे आता जमते
याचे प्रतीक आहे .....
आधुनिक युगातल्या म्हणी...
1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर
2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये
3) वंशाला हवा दिवा, ह म्हणते ईश्श तिकडे जावा
4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन
5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क
6) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत
7) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये
8) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार
9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार
10) मनोरंजन नको रिंगटोन आवर
11) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा
12) जागा लहान फ़र्निचर महान
13) उचलला मोबाईल लावला कानाला
14) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार
15) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं!!