आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
दुखी आई तिच्या मुलाजवळ बसली होती .......
मुलगा : माझ्या आजवरच्या पाहण्यात तू दुसरी सुंदर आई आहेस .
आई : पहिली कोण ?
-
-
-
-
-
मुलगा : तूच.... पण जेव्हा तू हसतेस
माझ्यापैक्षा जास्त तूच
रडली होतीस ना आई....
आई थंडी वाजतेय ग,
मायेचे
पांघरूण,आणि त्याची उब...
डोक्यावर थंड
पाण्याच्या पट्ट्या...
केसांवरून फिरणारा तो प्रेमळ
हात...
रात्रभर माझ्यासाठी जागलेले
डोळे....
मी ठीक कसा नाही होणार?
पण मी आजारी पडल्यावर,
माझ्यापैीक्षा जास्त तूच
रडली होतीस ना आई....
"झोप रे बाळा" शांत झोप,
नाही आई माझी परीक्षा आहे!
वर्षभर मी अभ्यास करावा,
म्हणून माझ्यावर ऑरडलिस...
नाही बाळा परीक्षा नंतर
देता येईल...
तू विचार नको करू शांत झोप...
मी परीक्षा देऊ शकलो नाही,
म्हणून माझ्या पैक्शा जास्त तूच
रडली होतीस ना आई.....
खूप दिवस उलटले आहे आता ..
मी शिकून मोठा ही झालोय...
पैसा ,गाडी ,लपटोप सर्व आहे....
पण तू नाहीस.....एकट वाटत ग,
तू माज्या जवळ नाहीस,
म्हणू आता प्रत्येक दिवस माझ
हृदय खूप रडत ग आई.
खूप रडत ग आई.....
आई - बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
आई
माया ममता भरुनी जीव लावते आई
नाही जगात कोठे अशी दूसरी ममताई.....
मंदिराचा कळस दिसावा तशी आईची ख्याति
अंगनातिल तुळशी प्रमाणे संभाळते घरची नाती
प्रेमस्वरूप तुझे वात्सल्य तुझी स्मुति मनात ठाई
घराघरात दारादारात तुझे स्मरण होते आई.....
वृक्ष जसे उन्हात न्हाउनी सर्वास देते साउली
तसे मनी दुख झेलुनी सुख देते माउली
देवाचेही भान हरपते तुझ्या ममते पाई
हात जोडून देव म्हणे तुला शरण गे आई.....
अर्थहिन् जीवन होता तूच देते वैभव माया