कुणी कुणापासुन दूर नसते,
कुणी कुणाच्या जवळ नसते..
प्रेम तर स्वःताहून जवळ येत असते,
जेव्हा कुणीतरी कुणाच्या नशिबात असते..
प्रेम कसे असावे...
पानांवरील दवासारखे,
सूर्याच्या तेजाने...
चमचमत्या मोत्यासारखे.
प्रेम कसे असावे...
उमलणाऱ्या कळीसारखे,
थेंबाच्या स्पर्शाने...
लाजून मोहरण्यासारखे.
प्रियकर :
"...तू येण्याआधी मी ठरवलेल असतं
की आज तुझ्याशी खुप काही बोलावं...
पण प्रत्यक्षात जेव्हा तू येतेस ना
की मग वाटतं.., बस तुलाच बघतच रहावं .."
प्रेयसी :
"...मी ही घरून विचार करूनच निघते
की आज तुला खुप काही सांगावं...
पण एकदा का तुझ्या मिठीत आले ना
की मग वाटतं..,जावू देत त्या गप्पा.., असच तुझ्या कुशीत रहाव......"
खूप प्रेम करतो तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू,
आपले मानून बघ. वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू फक्त सांगून बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे,
तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा, तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे. वाटलेच कधी तुला तर,
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करतो,
तुझ्यावर अगदी मनापासून.....!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन,
मनापासून..... फक्त तुझ्यासाठी....!!!!
जेव्हा एक मुलगी मुलाची काळजी घेते..
तेव्हा मुलाला वाटत ते प्रेम आहे..
पण..?
ती मैत्री असते..
परंतु..?
जेव्हा मुलगा मुलीची काळजी घेतो तेव्हा मुलीला वाटते..
ती मैत्री आहे पण ते प्रेम असते