A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


प्रेयसी :- कसला विचार करतोस ?

प्रियकर :- मी विचार करतोय
त्या वेळेचा, ज्या वेळेस पृथ्वीवर
पाठविण्यासाठी देव तुला तयार करत
होता ......!!!

प्रेयसी :- wow !!
Interesting ....... मग पुढे ???

प्रियकर :- ती वेळ देवासाठी नक्कीच
अवघड गेली असणार, देव खूप
गोंधळला असणार .....

प्रेयसी :- असे का ?

प्रियकर :- कारण प्रत्येक जणाने
तुला मिळवण्यासाठी नक्कीच देवाकडे
प्रार्थना केलेली असणार...


मनातले शब्द न शब्द
तुलाच सांगायचे आहेत
भविष्याचे वेध
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत

रंगवलेली स्वप्ने
सत्यात साकारायची आहेत
फक्त मला प्रिये...
त्यासाठी,
साथ तुझी हवी आहे...


पहिल्या प्रेमाची रीतच न्यारी,
आयुष्यभर न सरणारी;
रुसवे- फुगवे,हट्ट, भांडणानाही लाडिक म्हणणारी;
प्रेमाने आतून ओथंबून वाहणारी,
अन ओठावर आल्यावर मुके
करणारी;पहिल्या प्रेमाची रीतच न्यारी,
तुटके हृदय अन पोखरलेल्या
मनास, आठवणींच्या बळावर सावरणारी;
आयुष्यभर न सरणारी..!!


आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..


ज्या बद्दल विचार करतो
ज्या बद्दल स्वप्न पहातो........
ज्याचे गाणे आनंदाने गातो
ज्यामुळे सुखाची झोप घालवतो...
सारे सुख त्यासाठी त्यागतो .........
नसेल तर त्याचा शोध घेते ...
असेल तर गमवायला घाबरतो...
त्या आधारे सारे जीवन जगून जातो .....
निरपेक्षपणे मिळावे हेचं मागंणे मागतो
जेव्हा गवसते काय करावे समजत नाही
त्या शिवाय दुसरे काही सुचतचं नाही
शब्द अगदी छोटा पण त्याची व्याप्ती उमगत नाही
सांगायचा प्रयत्न केल्यास सांगणे जमत नाही ......
शब्दात व्यक्त करणे अशक्य .......
त्या शिवाय जगणे कधी न शक्य .....
पहा कुठेही चराचरात दिसते
मनात अंतरी खोलवर वसते .....
असे काय आहे हे का विचारतात
अरे कदाचित ह्या सार्‍याला ' प्रेम ' म्हणतात......

Marathi Status