A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Poem Status Updates


नविन कविता लिहायची
आहे तर शब्द मिळत नाही

आणि शब्द मिळाले तर
ते मांडता येत नाही

काय करायचं
डोक्यात अनेक विचार आहेत

पण त्या विचारांना
त्या शब्दांशिवाय तोड नाही

कधी एकांतात बसतो
तेव्हा काहीच सुचत नाही

जाणवते ते सुद्धा
एकटेपणाचे अस्तित्वं

जसा जीव टांगनीला लागला आहे
पण त्याचा ही काही उपयोग नाही

नविन कविता लिहायची
आहे तर शब्द मिळत नाही

आणि शब्द मिळाले तर
ते मांडता येत नाही


तू खरच किती निरागस होतीस..
सगळ्यांपासून वेगळी तरीही सर्वांमध्ये हरवलीस..
अचूक इशारे कळायचे तुलाही माझे..
इशार्यांच्या पलीकडे त्यावेळी तू डोळ्यांनी बोललीस..
पहिले वाहिले प्रेम तू मनात सजलीस..
शाळेतून सुटलो आपण नंतर मात्र खूप दूर गेलीस.. आजहि आठवतो तुझा लडिवाळ लाजरा चेहरा..
हुंदके येती त्या क्षणांचे अन तसाच
मोहरणारा तुझ्या केसातला मोगर्याचा गजरा..


नेहमी व्यहवारी असा
व्यवसाईक होवू नका
प्रेमात उभे रहायला शिका
मात्र कधी प्रेमात पडू नका....

एकमेकात पूर्णपणे
अगदीचं हरवू नका
एकमेकांच्या मनात
स्वतःचे अस्तित्व शोधा

एकमेकांच्या प्रेमात
सुखाची सावली शोधू नका
पण एकमेकांच्या सहायाने
आपले असे आभाळ शोधा.....

प्रेमात कसलीचं बंधनं
एकमेकांवर लादू नका
स्वतःचे अस्तित्व जपून
त्यांचे अस्तित्व जपायला शिका


तू असता --- तू नसता
तू असतेस तेव्हा काळोख ही प्रकाशमान होतो
... तू नसतेस जेव्हा भर दुपारीही अंधारून येतं

तू असतेस तेव्हा अश्रूंचेही मोती होतात
तू नसतेस जेव्हा मोतीही अश्रूंच्या सरी भासतात

तू असतेस तेव्हा दु:खालाही हसू येते
तू नसतेस जेव्हा सुखही माझ्यासवे रडू लागते

तू असतेस तेव्हा निवडून्गालाही बहर येतो
तू नसतेस जेव्हा मोगराही फुलायला नकार देतो

तू असतेस तेव्हा दु:खातही मी उभा राहतो
तू नसतेस जेव्हा सुखातही मी उन्मळून पडतो

तू असतेस तेव्हा मृत्यूलाही अर्थ असतो
तू नसतेस जेव्हा जगण्यालाही अर्थ नसतो


एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागेलपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी,
एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीणअसणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी. एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

Marathi Status