आई : बेटा, माझे डोळे खराब झाले तर तू काय करशील ???
मुलगा : मी तुला सर्वात चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जाईल.....
आई : तरीदेखील डोळे ठीक नाही झाले तर....????
मुलगा : मी खूप पैसे जमा करेल आणि विदेशात घेऊन जाईल
ऑपरेशन साठी....
मुलगा : ....आई जर माझे डोळे खराब झाले तर तू काय
करशील ?
आई हसत हसत म्हणते,"बेटा, मी तुला माझे डोळे देईल "
कोणीही आई च्या प्रेमाची बरोबरी नाही करू शकत
एक ५ वर्षांची निरागस मुलगी एका औषध विक्रेत्याकडे जाते,
आणि त्याला विचारते " माझ्याकडे हे काही मी दररोज जमा केलेले पैसे आहेत त्या बदल्यात मला दैवी चमत्कार विकत पाहिजे "
.
.
औषध विक्रेता गोंधळाला...
त्याने त्या निरागस मुलीला विचारलं "तुला दैवी चमत्कार का हवाय ?
मुलगी :- डॉक्टर म्हणतात की फक्त माझ्या आईला झालेल्या दुर्दम्य आजारातून फक्त " दैवी चमत्कारच " जीवन दान देऊ शकतो ....
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही
आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील
"आई" मला विचारते,
कोण जास्त सुंदर आहे रे,, मी कि तुझी मैञिण..???
मी म्हणालो.,,,,
"आई मला खरचं माहीत नाही गं..........
पण,,,, जेव्हा मी तुला पाहतो,,,
तेव्हा मी तीचा चेहरा विसरतो........... .
आणी जेव्हा मी तिला पाहतो,,
तेव्हा मला फक्त तुझाच चेहरा आठवतो.....!
एका मुलाचं वक्तव्य....
माझ प्रेम तिने जरी मान्य केल नाही..... तरी मी तिच्यासाठी जीव नाही देणार....
तिला दुसरा मुलगा जरूर मिळेल.... पण माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही.....