A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates


एक अनोळखी कॉल

तो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ....वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे .......

थोड्या वेळानंतर
आणखीन एक अनोळखी कॉल

तो:-हे तुला bf आहे का ??
ती :-नाही नाही मला नाहीये...:x
तो:-मी तुझा bf बोलतोय...तू आज माझ हृदय तोडलीस...
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ....मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय
तो:-आता पकडली गेलीस ....मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो


एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या ...:)


कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात....त्यांना भेटायचं असतं...

मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये...

मुलगी नाणं खाली फेकते.....
पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो...

मुलगी : एवढा उशीर का केलास???

मुलगा : मी ते नाणं शोधत होतो....पण सापडलच नाही :o

मुलगी : अरे मूर्खा....सापडणार कसं???
मी दोरा बांधून खाली फेकलं होतं...मी घेतलं ते ओढून :P


एका बाईला १० मुलं असतात.

पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत?
बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.
पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं?
बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना...


चम्प्या ला रस्त्यात लावलेले फलक वाचायचा भारी नाद असतो...

एकदा रात्री घरी येताना एक फलक त्याला दिसला,

रात्र असल्याने थोडासा अंधुक दिसत होता...

म्हणून चम्प्या स्पायडर म्यान सारखा खांबावर चढला....

त्याने वाचल तर बोर्ड वर लिहील होत...

"खांबाला लावलेला रंग ओला आहे, हात लावू नका...." :D

Marathi Status