A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


" सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तुला....??? "
मी म्हटलं, " स्वप्न पहायला.. यावर सगळे हसू लागले.. वेडी आहेस म्हणाले
मीही हसले .. पण खरच..
मला स्वप्नं पहायला खूप आवडत..

कारण ती एकच जागा उरलीये आता
जिथे तो अजुनही भेटतो मला
.
.
.
अगदी न चुकता....!!


स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...

कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...
अन स्वप्नातल्या तुला,परत सत्यात पाहण्यासाठी...

जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...
खरच खूप तळमळतो ...

" waiting for my dream to become reality... "


आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर..
बाहुलीच होती ती .. शब्दशः बाहुली
सोनेरी केस.. उन्हात रंगलेले
मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी!
हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं
पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या
मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या
एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे..
टपोरे काळेभोर डोळे..,एखाद्या हरिणीचे असतात तसे..
स्वभाव.. स्वभाव काही कळला नाही पण
तेवढं मात्र राहूनच गेलं..
पण घोळक्यात फिरायची नेहमी
शेजारीशी बोलायची, अन डोळे चुकवायची नेहमी
एखाद्याला आसमंत दाखवणारी, अस्मानिची अशीच ती
सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.., माझं पहिलं प्रेम..


तिचे ओळखीचे असूनही अनोळखी असणे... आवडते मला,

तिचे ओळखीचे असूनही अनोळखी असणे... आवडते मला,
दोन क्षण तिच्यासभोवती असणंही... आवडते मला,
ऱोज बहाणे करुन तिच्याकडे जाणे... आवडते मला,
तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकणे.. आवडते मला,
कधीही डोळ्यात डोळे घालून विचारले, तर हो म्हणेल ती,
पण तिचे डोळे झुकवून 'नाही' म्हणणे... आवडते मला,
ती आहेच माझ्यासाठी खास, तिने मला काहीही म्हणावे,
मजनू, पागल किंवा वेडा... ते आवडते मला!
तिला लोक कमळाचे फ़ुल म्हणतात, ती नुसतीच हसते,
लोकांचे मला भ्रमर म्हणणे... आवडते मला!
कुणास ठावूक तिचे माझे काय नाते आहे?
माझ्या स्वप्नात तिचे येणे... आवडते मला!..


प्रेयसी :-
तुला कित्ती वेळा सांगितले रे
सिगारेट ओढत नको जाऊस
म्हणून ......तू ऐकत
का नाहीस ?
प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय,
पण सुटतच नाहीये ...त्यात
आपल्या घरचे tension देत
आहेत ....लग्नाला नाही म्हणत
आहेत .....!!
प्रेयसी :- हे tension मला पण आहे ....पण म्हणून
मी पिते
का सिगारेट ?
प्रियकर :- अग मग कसे
समजावयाचे
ह्या घरच्यांना ......... !!!
प्रेयसी :- अरे म्हणून काय, सिगारेट, दारू,
चीडचीडपणा ......हि आपल्या समस्ये
वरील औषधे आहेत का ?
प्रियकर :- हे बघ .... उगीच
मला lecture देऊ नकोस ......
त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार
कर !!
प्रेयसी :-
घरच्यांच्या आधी तुला समजावणे
जास्त जरुरीचे आहे ..................
प्रियकर :- म्हणजे ? प्रेयसी :- चल माझ्या बरोबर ..
प्रियकर :- कुठे ?
(तिथेच
शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात
ती प्रेयसी त्याला घेऊन
जाते ................ मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून
द्यावी लागते, तो नाराजीने
हाथ जोडून कपाळावर
आठ्या आणून तिच्या बरोबर
उभा राहतो)
प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात
गणपती बाप्प्पा ला म्हणते :- हे
विघ्नहर्ता, ह्याची एक
सिगारेट म्हणजे
माझ्या आयुष्यातील एक
दिवस .......... ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे
माझ्या आयुष्यातील दिवस तू
कमी कर .........
हि माझी तुझ्याकडे
प्रार्थना, ...... कारण सिगारेट
तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे
ह्याला कदाचित कधी कळणारच
नाही ......!!

Marathi Status