प्रेम करणं काही गुन्हा नाही
पण म्हणतात,
खरं प्रेम एकदाच होतं
पुन्हा पुन्हा नाही..
...स्वत:चं आयुष्य झोकुन द्यायचं
... स्वत:चं अस्तित्व विसरून जायचं
प्रेमात पडल्यानंतर सारंच जगणं
रोजचच आयुष्य नव्याने जगायचं
रोजच खेळ नवा मनाचा,
होत ही तो जुना नाही
पण, खरं प्रेम एकदाच होतं
पुन्हा पुन्हा नाही.
कुणीतरी मला विचारले, ती कुठे आहे..?????
मी हसत उत्तर दिले: माझ्या श्वासात, माझ्या हृदयात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..
.
.
.
.
.
.
यावर पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही..?????
मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले: माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात
प्रेम हि कल्पना असेल, पण सुंदर आहे ना...
प्रेम हे वेडे असेल, पण गोड आहे ना...
प्रेम हे वाईट असेल, पण चांगला अनुभव आहे ना...
प्रेम वगेरे वगेरे असेल, पण कधी तरी
वगेरे वगेरे शिकायला हवे ना........
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही...
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही...
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
एक कटु सत्य..,
मुलगा नेहमी प्रेमाची सुरुवात
"आपण मित्र आहोत"..
हे बोलुन करतो..,
आणि
मुलगी प्रेमभंग ..
"आता आपण फक्त मित्रचं आहोत"...
हे बोलुन करते.. !!