A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Wise Status Updates


जगात तीन प्रकारची माणस असतात...
१. 'वाट' बघणारे
२. 'वाट' लावणारे
अन
३. 'वाट' शोधणारे
शब्द तोच आहे ... पण त्याच्या उपयोग जो तो आपल्या हिशोबाने करतो...
काही लोक, 'जे होत ते चांगल्या साठीच होत' असं म्हणत काहीतरी होण्याची 'वाट' बघत बसतात... पण त्याला जर कृतीचीसाथ नसेल तर मग त्यांची 'वाट लागते'...
'वाट' लावणाऱ्या बद्दल तर बोलायलाच नको... हे लोक पूर्ण वेळ स्वतः खाली राहून दुसऱ्याला सुद्धा खाली ओढण्यात मग्न असतात... त्यांच्या आनंदाची परिसीमा तेवढीच...
त्यातला तिसरा वर्ग महत्वाचा... 'वाट शोधनार्यांचा' ... कितीही संकटं, कितीही अडथळे आले तरी जिद्दीने नवीन वाट शोधणारे मग पुढे निघून जातात...
आपण कुठली 'वाट' निवडायची ते आपणच ठरवायचं..
इच्छा असली तर मार्ग सापडतोच !!!


यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
--विश्वनाथन आनंद


आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय प्रेमा मनुष्य नैतिकता विसरतो दारुने एक कुटूंब बाद होते तर प्रेमात दोन कुटूंब


संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त तसं पाहायला हवं,
प्रत्येक नात जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं,
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त ते समजायला हवं,
प्रतेकान्कडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो, फक्त निस्वार्थी असायला हवं.


जीवन जगण्याशी कला $
संकटाला कधी कंटालायचं नसत
त्याला सामोरेच जायचं असत
कुणी नाव ठेवलं तरी थांबायचं नसत
आपल चांगल काम फुलवायचा असत
अपयशाने कधी खाचायचं नसत
जिद्दीने बळ वाढवायचं असत
नाराज मुळीच व्हायचं नसत
पुढे अन पुढेच जायचं असत
लोक निंदेला घाबरायचं नसत
आपल सामर्थ्य दाखवायचं असत
जीवनात खूप करण्या जोग असत
आपल फक्त तिकडे लक्ष नसत
जीवन हे असच जगायचं असत
जीवन हे असच जगायचं असत

Marathi Status