जे तुला हि न कळले,
जे मला हि न कळले,
ते आपल्या नयनांना कळले...
अबोल प्रेम हे आपले,
आज सार्या जगाला कळले....
फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला,
आज सार्या जगाने पाहिले...
अन कळत नकळतच,
आपल्या या मैत्रीच्या नात्याला,
प्रेमाचे नाव जुळले...
प्रेमाचे नाव जुळले...
रंग माझा वेगळा
रंग कोणता म्हणावा
नाही कसला रंग
सार्यात मिसळून जावा
आहेचं असा बेरंगी
म्हणायला काही नसावे
रंग माझा तोचं आहे
ज्या रंगात रंगवावे
बेरंगी रंग माझा
रंग रंगात रंगला
रंग रंग रंगत सारे
पुन्हा रंगहीन जहाला
तुझी वाट पाहताना दिवस संपतात...
पण वाट पाहणं संपत नाही...
आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं...
मला अजूनही जमत नाही....
का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..??
का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता..,
पुन्हा वाहायला लागतात... ?
का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते... ?
का तुझी आठवण नको असताना येतच राहते..!!
माझ्या Shwasas तू सांग मला समजावून,
प्रेम म्हणजे नक्की काय?
विश्वासच मजबूत जाळ कि
मृगजळाची पातळ साय? तू सांग मला समजावून,
प्रेम होत तरी कसं?
खरच स्पंदनांच्या लहरी उमटतात कि
मनच होत वेडपीस तू सांग मला समजावून,
प्रेम असत का आंधळं?
... अधीर होतात गात्र गात्र का
नुसताच साचतं आभासाच तळ? तू सांग मला समजावून
प्रेम खरच आहे का आपल्यात?
आपल्यातल्या विश्वासात? विश्वासातल्या श्वासात?
श्वासातल्या माझ्यात? माझ्यातल्या तुझ्यात?
असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागतं......
... असं का होत? कुणाचीतरी खुप आठवण यायला लागतें...
अनं ते आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागतें....
असं का होत? कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येतं........
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जाते......
असं का होत? कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो.......
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो....
असं का होत? कुणीतरी क्षणभर आनंद देऊन जातो.....
अनं तो आनंदच सगळ्या दुःखानंच मुळ होऊन जातो....
असं का होत? कुणासाठीतरी जगावास वाटतं......
अनं जगावास वाटतानाच, मरणाला कवटाळाव लागत