मुलगा - उद्या पासून मी तुला नाय भेटणार ..
मुलगी - का रे ?
मुलगा - तुझ्या गल्लीतली पोरे लई बदमाश आहेत ...
मुलगी - काय झाल ?
मुलगा - काय झाल म्हणजे ? माझ्या मागे कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात ..
"प्यार किया तो डरना क्या ?" :D :D
मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा :- बर....
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा :- बर.....
मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी.... मुलगा :- बर...
मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई, वडील, भाऊ,बहिण नसावा....
मुलगा :- अजून काही म्याडम...
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे....
पुणेरी पोट्ट : तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील कि हृदय तुटे पर्यंत प्रेम करशील ?
नागपुरी पोट्टी : बापू तुटलेल्या चपलेन मार खाशिन का चप्पल तुटेतोवर मार खशिन …. !!
प्रियकर - मी आज तुझ्या घरी गेलेलो...... मला वाटत नाही आपले लग्न होईल
प्रेयसी - का? काय झाले? तू माझ्या आईला भेटलास का ?
प्रियकर - नाही तुझ्या बहिणीला भेटलो......... आयला काय दिसते यार
जग मुलींचेच आहे :P
लोकांच्या मनाप्रमाणे ...
जर एखादि मुलगी जोरात हसली -->पोरगी उत्साही आहे
जर एखादा मुलगा जोरात हसला---->मुलाला चांगले संस्कार नाही आहेत .
जर एखादी मुलगी प्रेमाने बोलली-->मुलगी आकर्षक आहे
जर एखादा मुलगा प्रेमाने बोलला-->मुलगा फ्लर्ट करतोय
जर एखादी मुलगी शॉपिंग करत असेल--->तिला पैसे खर्च करायची अक्कल आहे
जर एखादा मुलगा शॉपिंग करत असेल--->बापाचे पैसे वाया घालवतोय
जर एखादि मुलगी शांत बसली असेल--->पोरगी लाजाळू आहे
जर एखादा मुलगा शांत बसला असेल--->पोरगा उद्धट आहे .
जर एखादि मुलगी ग्रुप ने जात असेल--->तो ग्रूपच असतो
जर एखादा मुलगा ग्रुप ने जात असेल--->ती गँन्ग् आहे..!