A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates


मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली तर मंग्या ने
आपल्या मनातील भाव
अश्या प्रकारे व्यक्त केले .
.
.
.
.
.
.
.
.
.
" चेहरा तुझा खास नाही, शरीरावर तुझ्या मांस नाही,
प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत पण
जगण्याची तुझी आस नाही "


डॉक्टर - हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे..
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा..

गंपू - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.

डॉक्टर - किती वेळ खेळता?

गंपू - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत..


शिक्षिका :- चल बंडू, ह्या नकाशामध्ये "अमेरिका" कुठे आहे दाखव....

बंडू उभा राहतो आणि नकाशात बोट दाखवून म्हणतो, "हे बघा अमेरिका.."

शिक्षिका :- शाबास बंडू, मुलांनो आता सांगा, अमेरिकेचा शोध कोणी लावला???
.
.
.
.
.
सर्व जन एकदम ओरडतात, "बंडूने...." :D :D


शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.

पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.

तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.

मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो
.
.
.
.
मुख्य प्रवेशद्वार.....:D :D :D


नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,

गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,

"तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?"

गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात....!!!

Marathi Status