A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


प्रेयसी :-"चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे
संशयाने बघतात, नावे ठेवतात, त्यांना वाटते आपण
टाईमपास करत आहोत ..... मला नाही आवडत असं, अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!"
हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत किती ?
प्रेयसी :- पाचशे !!
प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :-"आता ह्याची किंमत
किती ?"
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत
मिळवतो"आता ह्याची किंमत किती?"
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :-"हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू,
लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार
नाही !!!


खर्या प्रेमाची सुरुवात होते ......... विश्वासाने
आणि अंत होतो .......... अखेरच्या श्वासाने


शाळेत एका लहान मुलाने
आपल्या मैत्रीणीला
विचारलं : काय गं हे प्रेम
काय असतं ?
.
.
.
.
.
.
.
.
मैत्रीण : प्रेम म्हणजे ?

मला माहितीये की तू
मधल्या सुट्टीत,

रोज माझ्या
बॅगेतल्या कप्प्यातली
चोकलेट चोरून खातोस,

आणि तरीही मी आज ती
त्याचं ठिकाणी ठेवली आहेत..


कळत नकळत सगळ घडत होते,
आणि मी तुझ्यात गुंतत होते

चेहर्‍यावरचे हसू सुद्धा तूच,
आणि डोळ्यातले अश्रू सुद्धा तूच

जीवनाचे गाणे सुद्धा तूच,
आणि मनातले तरंग सुद्धा तूच

माझा श्‍वासही आहेस तूच,
आणि माझी रासही आहेस तूच

जीवनाला अर्थही आहेस तूच,
आणि जीवनातला पार्थही आहेस तूच

माझ्या जीवनाची दिशा ही तूच,
आणि माझ्या जगण्याची आशाही तूच

मी सुद्धा तुझीच आहे,
आणि फक्त तुझीच आहे.


तुला पाहून मन माझे फुलले
निरागस मनाला मैत्रीच्या रुपात
प्रेमळ शब्दांचे आधार दिलेस
शब्द शब्दांनी जिंकलेस तू मला
मन माझे प्रसन्न झाले
निरागस मनाला प्रेमळ शब्दांचे आधार दिलेस...

Marathi Status