आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात
कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर
आपला इतका विश्वास असणे
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार
नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते..
तुमचेच आहेत....
आणि तुमचेच राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल
वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
आणि हेच खरे प्रेम.....:)
प्रेम म्हणजे जणू थंडीतला बेधुंद गार वारा...,
प्रेमाचा स्पर्श होताच अंगावर येणारा शहारा...
तो आणि ती... अश्याच एका निवांत क्षणी...
ती: ए मी जर तुला म्हटलं की तू आत्ता काय करू शकतोस माझ्यासाठी तर ...
तो: बोल चंद्र आणू की कुठून उडी मारू...
ती: उगाच फिल्मी होऊ नकोस ...
तो: बरं बरं... Well, तसं जास्त काही नाही... पण बोल तू... मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे...
ती: don't worry , अगदी चंद्र वगैरे आणायला नाही सांगत आहे मी... पण atleast तू माझ्यासाठी छान छान Roses आणू शकतोस, खूप साऱ्या chocolates आणि pastries आणू शकतोस आणि.... आणि....
तो: sorry, sorry, sorry यापैकी काहीही जमणार नाही मला...
ती: कर्म माझं :( ... का कळेना. I Miss u
तो: (तिला जवळ ओढत... थेट तिच्या डोळ्यात बघून...) हो नाही जमणार... कारण हे सगळं करायला मला काही वेळ घालवावा लागणार... आणि आत्ता तुझ्या या चेहऱ्यावरून एकही क्षण नजर दूर करायची इच्छा नाहीये माझी...
ती: (लाजत..) कर्म माझं :).. I Love U.
मुलगी नक्की कशी असते?
तिचा प्रियकर तिला मिळायच्या आधी मुलगी म्हणते:
माझा प्रियकर परफेक्ट असायला हवा,
त्यानी माझ्यावर माझ्या पेक्षा जास्त प्रेम करावे,
त्यानी मला कधी कध्धीच रडवू नये,
त्याने मला नेहमी समजून घ्यावे.
पण तिचा प्रियकर तिला मिळाल्या नंतर ती म्हणते:
तो परफेक्ट नसला म्हणून काय झाले ?? तो माझा आहे.. कारण मी त्याच्यावर खूप प्रेम करते.
तो माझ्यावर जास्त प्रेम करत नसला म्हणून काय झाले?? मी तर करते ना..
तो समजून घेत नसला म्हणून काय झाले?? मी तर समजून घेत आहे ना.. आणि नेहमी समजून घेत राहील, Coz I lov him a lot. I Love U.
अशा असतात या वेड्या मुली.. :)
ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस ना ?
तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ सोडते का, मी तरतुझी सावली आहे.....
ती : पण मग अंधारात ? अंधारात जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण मला विसरशील ? मला अंधाराची खुप भीतीवाटते रे....
तो : भिवु नकोस. मी आहे ना. अंधार पडला तर मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईनना.
ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल ...