आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an
attachment )
अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून बसतो......
सर्व काही असून नसल्यासारखे वाटते.....
आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a
lonliness )
कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं
आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपल्याला सर्व
काही मिळतं....
वेळ लागला तरी चालेल...
पण वाट तुझीच पाहीन...
विसरलास तू मला तरीही...
नेहमी मी तुझीच राहील....
मनात प्रेमाचा ओलावा असणे
महत्वाचे असते ..........
.....तसे पाहीले तर आठवण
कुणाची पण केव्हाही येत असते ...........
आजही मला,
एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत...
माझ्या काही शब्दांन मोळे, हरवल मी तुला,
आज त्या शब्दांना आठवून,
स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत...
अन तू नसतानाही,
ह्या आठवणींच्या विश्वात,
फक्त तुलाच पाहायला आवडत...
फक्त तुलाच पाहायला आवडत...
उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे
उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे
मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.
उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस
आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस
“सणाला तरी हसत जा” तु अस म्हणशील”
बाहेरच जग पाहत जा” तु असही म्हणशील
“कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
तु मात्र सुखाने जगत जा” तु असही म्हणशील.
पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय
यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय
आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता
तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय.