A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates


एकदा ऑफिसमध्ये झंप्याने चुकून बॉसच्या केबिनमध्ये फोन लावला.

झंप्या : ए...दोन मिनिटांत माझ्या टेबलवर कॉफी आणि बिस्कीटचा पुडा पाठवून दे.

बॉस : (चिडून) व्हॉट नॉनसेन्स...तुम्हाला माहितीय का तुम्ही कुणाशी बोलताय ते?

झंप्या : नाही.

बॉस : मी या ऑफिसचा बॉस बोलतोय.

झंप्या : पण, तुम्हाला माहितीय का तुम्ही कुणाशी बोलताय ते?

बॉस : नाही.

झंप्या : थँक गॉड...बाय.... फोन कट..


बायको : अहो! ऐकता का?
घरामध्ये मीठ नाहीये,
मग आता भाजीत काय टाकु?
नवरा : अगं! डोक नाहिये का तुला?
घरात Colgate active paste आहे ना!
ते टाक भाजीत त्यामध्ये मीठच मीठ आहे.....! :P :P :P


चिकटराव : काय गं ..? ५०० रुपयाचे कानातले आण्याची, काय गरज होती ( चिकटराव संतापून बायकोच्या कानाखाली मारतात )

( चिकट रावांची बायको राड्याला लागते )

चिकटराव : अग रडू नकोस ,,,,,,,, मी तुला प्रेमापोटी ...

( चिकटरावांची बायको पदर खोचती आणि चिकटरावांच्या २ - ३ कानाखाली लावते आणि म्हणते

चिकटरावांची बायको : तुम्हाला काय वाटल मी तूम्हच्या वर प्रेम नाही करत .......?


मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंयमुलीचा
बाप : (चिडुन) मुर्खा.. तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही
मुलगा : अरे बाप रे.... ईतकी शेमडी असेल तर राहुद्या.. :-D :-D


बेरोजगारी :-
पहिला मित्र : अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस, गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ??
रमेश : हळू आवाजात .. अरेमाझे सोड ...जो वडापाव आणि भज्या तळत आहे ना तो CA आहे.....:D :D :D

Marathi Status