अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू
जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !..
किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना
जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !..
मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे
भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..
रोज तुझी आठवण येते आणि
डोळ्यांत पाणी उभं राह्तं...,
तू जवळ हवास असं वाटताना
खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...
तुझ्या प्रत्येक आठवणीने होते माझी रोजची पहाट आणि ओलावतात भावनांनी डोळ्यांचे काठ.
तू नाही भेटत,
याचे नाही काहीच दु:ख मला..
तू नाहीस तरी,
तुझ्या आठवणींनी कुठं सोडलय मला..?
माहीत आहे आठवणी,
तुझी जागा नाही घेऊ शकत..
पण तुझ्याविना,
मी जगु ही नाही शकत..
आठवणीने तुझ्या घनदाटून आला, हूंदक्यांनी माझा कंठ दाटून आला , पाऊस ही आता जोरात बरसू लागला, रडून घेहे डोळयतील थेंब सांगू लागला