"एक मुलगा व मुलगी खेळत
होते ........... मुलाकडे
प्लास्टिकची फुले होती व मुलीकडे
चोकलेट्स होती.
दोघे ठरवतात कि ते एकमेकांना सर्व फुले
व चोकलेट्स देतील
........ त्याप्रमाणे त्या मुलाने एक मोठे
फुल आपल्याकडे ठेवून बाकी सर्व फुले
तिला दिली, पण तिने मात्र
बोलल्याप्रमाणे सर्व चोकलेट्स
त्या मुलाला दिली.
त्या दिवशी रात्री त्या मुलीला शांत
झोप लागली, पण मुलगा मात्र विचार
करत बसला, "कि जसे मी एक फुल
तिच्यापासून लपविले तसे काय तिने
सुद्धा एक चोकलेट माझ्यापासून लपविले
असेल का " ? ह्या शंकेने त्याचे मन
विचलित झाले व त्याला सुखाची झोप
मिळाली नाही.
तात्पर्य :- जर तुमच्या नातेसंबंधा मध्ये
तुम्ही दुसर्याला आपले सर्वस्व अर्पण
केले नाहीत, तर तुमच्याच मनामध्ये
शंका कुशंकांचा गोंधळ नेहमी नाचत
राहणार.
कुणाची मदत
करत असताना
त्याचा डोळ्यात
बघू नका
कारण
त्याचे झुकलेले
डोळे तुमच्या
मनात गर्व निर्माण
करू शकतो.
प्रिय बाबा, आठवतंय मला,
तुम्ही बोट धरून चालायचं शिकवलेलं,
माझं पहिलं पाऊल धडपडलेलं
तुमच्या काळजाचा ठोका चुकवलेलं,
तुमच प्रेम नेहमीच मिळवलेलं
प्रिय बाबा, आठवतंय मला,
तुम्ही मला लाडाने पिल्लू म्हणलेलं,
आईला देखील दोन शब्द बोललेलं,
लाडाने जवळ घेऊन अ, आ, ई, गिरवलेलं,
खाऊ शिवाय कधी बाहेर न जाऊ दिलेलं,
प्रिय बाबा, आठवतंय मला,
शिक्षणासाठी सर्वस्व डावावर लावलेलं,
कष्टाने मिळेल तेच मिळवलेलं,
तुमच्या संस्कारांनी आयुष्य घडलेलं,
आजही आयुष्य तुमची उणीव भासलेलं,
प्रिय बाबा, आठवतंय मला,
प्रत्येक नात्यातले वेगळेपण,
शब्दांत मांडता येत नाही,
मनातल्या भावनांना,
शब्दांचे बांध घालता येत नाही...
संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त
तसं
पाहायला हवं,
प्रत्येक नात जवळचं आहे,
फक्तते
उमजायला हवं,
प्रत्येक गोष्टीला अर्थ
आहे, फक्त ते
समजायला हवं,
प्रत्येकांकडून प्रेम
आणि जिव्हाळा मिळतो,
फक्त
निस्वार्थी असायला हवं.