प्रेमात तुला दूर करणे कठीण होते..,
ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते..,
सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे...
कारण..???
तुला विसरून जगणे फार कठीण होते..
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली
चाळताना जीवाची झाली होती काहिली
पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली
तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली
एक दिवस जेव्हा
माझा श्वास बंद होईल..
.
नको विचार करुस
की माझे प्रेम कमी होईल..
... ... .
अंतर फक्त एवढं असेल..?
.
आज मी तुझी
आठवण काढत आहे..
.
उद्या..?
.
माझी आठवण तुला येईल...!!!
आठवण ...., आठवण आहे....,
तिचं कामच आहे
आठवत राहणे ..,
ती कधी वेळ
काळ बघत नाही ..,
तिला वाटते तेव्हा
येऊन जाते ..,
कधी हसवते
तर ..,
कधी रडवून जाते
तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन तेव्हा तुझी आठवण येईल...
पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन
तेव्हा तुझी आठवण येईल...
संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल तेव्हा तुझी आठवण येईल...
पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल तेव्हा तुझी आठवण येईल...
जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल तेव्हा तुझी आठवण येईल...
तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते मी शेवटचा श्वास घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल.