A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Latest Status Updates


वास्तवातली दुनिया
स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या
खरी आहे,

पण मात्र स्वप्नातली
माझी दुनियाच बरी
आहे,

जिथे प्रेम असते,
तो असतो,
मन माझे नेहमी हसते जिथे,

म्हणूनच मला आवडते
नेहमी राहायला तिथे....

शुभ रात्री .


चिंगीची आई व चम्याची आई आपल्या पोरांचे कौतुक करीत होत्या.
चिंगीची आई : आमची चिंगी ना पंधराव्या वर्षी एसएससीची परीक्षा पास झाला.
चम्याची आई : हे तर काहीच नाही, आमचा चम्या तर नवव्या वर्षी एसएससी झाला.
चिंगीची आई : अहो पण एवढ्या लवकर तो एसएससी कसा काय पास झाला?
चम्याची आई : तुमची शपथ, खरे सांगते. तो एसएससीच्या परीक्षेत आठवेळा नापास झाल्यावर नवव्या वर्षी पास झाला...
चिंगीची आई बेहोश... चम्याची आई मदहोश.....


जडलो घडलो फेसबुकावर
रडलो हसलो फेसबुकावर
.
तिने सोडले होते मजला
पुन्हा भेटलो फेसबुकावर
.
ठाव न पत्ता ज्या गावाचा
तिथला बनलो फेसबुकावर
.
फोटोमध्ये चिकणी दिसली
भाळुन फसलो फेसबुकावर
.
पूर्वी होतो किती 'श्यामळू'
'चटोर' बनलो फेसबुकावर
.
शेजाऱ्याला जाणत नव्हतो
'फ्रेंड' जाहलो फेसबुकावर
.
नको नको ते 'टॅग' लागले
'लंपट' ठरलो फेसबुकावर
.
किती भेटले आंबटशौकिन
म्हणुनच रमलो फेसबुकावर !


वडील: तुला परीक्षेत 95% पाहिजे बरा का!
मुलगा: फक्त 95% ? 105% मिळवीन!
वडील: का रे थट्टा करतोस का?
मुलगा: पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना


स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप
सुंदर आहे..

Marathi Status