A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Latest Status Updates


आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील.........
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!


कळत नव्हते प्रेम म्हणजे काय.......
तरी तुझ्या प्रेमात पडले मी.. तुझ्या सोबत जगण्याचे
सुन्दर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यात
सदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाच असते
उशिरा हे जाणले मी.. तुझ्या प्रेमात पूर्णपणे
स्वताला विसरून गेले मी.. पण नशिबाला मान्य नव्हते
तुझ्या सोबत जगावे मी .


टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात..

नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोचो तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात....

सूर ही तू, ताल ही तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आसु ही तू हसू ही तू
ओढ मनाची नि हूरहुर तू
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात......


अगं माझा चश्मा कुठे आहे ?

अहो तुमच्या डोळ्यावरच आहे की....अशी गंमत झाल्यावर मिळणारा आनंद !
.

बाप होण्यापेक्षाही...आजोबा/आजी होण्याचा आनंद !
.
चहात साखर किंवा भाजीत मीठ विसरलेले असतानाही,

न बोलता...मिश्किलपणे संपवून टाकण्याचा एक वेगळाच आनंद !
.
नातवंडाच्या कृपेने अंगावरील कपडे ओले झाल्याचा वत्सल आनंद !

आणि

त्यांनी केलेले हट्ट पुरविण्याचा गोड आनंद !
..

सूनेने न मागता आणून दिलेल्या चहाचा व औषध घेतले का ?

या प्रेमळ चौकशीचा मोठा आनंद! वाढदिवसाला मुलाने दिलेल्या शालीचा....ऊबदार आनंद !

...आपण कुटुंबाला हवे आहोत......या भावनेचा सुप्त आनंद !
..
.. दातात अडकलेल्या मक्याच्या कणसाचा कण निघाल्याचा सुद्धा.....आनंदच !
..

दुपारी जेवणानंतर पेपर वाचता वाचता लागलेली डुलकी ...परमानंदच !
..

मित्रांच्या साठीशांती समारंभाचा आनंद...तिथे भेटलेल्या जुन्या सवंगड्यांमुळे होणारा...अपार आनंद !
..

याच 'साठी'...आनंदात जगायचा आनंद...

सर्वांनी सारे सारे नकारात्मक विचार सोडून दिले की मिळणारा....निर्भेळ "आनंद" !
...

आणि या सर्व आनंदाची बेरीज करून ती मनाच्या कप्प्यात साठविली की ,

पडल्यापडल्या लागलेली शांत झोप म्हणजेच..."ब्रह्मानंद" !!


तुला पहिल्यांदा जेव्हा बघितले ...
मनाने माझ्या स्वप्ने तुझी पाहिले ...
धुंद या राती सारे जग निजले ..
मनाने तुझ्या स्मृतीची चांदणे पांघरले ...

चंद्र हा पौर्णिमेचा सरला तरी ..
आहे एकच भाव तुझ्या चेहऱ्यावरी ...
का हा दुरावा मनी एकच प्रश्न पडले..
अश्रुतही तुझेच प्रतिबिंब दिसले .....

आला जरी असेल वसंत फुलून ...
जगतो मी अजूनही तुलाच बघून ...
स्वप्नातही मी तुलाच शोधतो ...
अमृतमय जीवन तुझे विष मात्र मी प्राशितो .....

Prev  1234Next
Marathi Status